मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ७  सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांत फेरबदल आहेत. यात  महावितरण विभागाच्या औरंगाबाद विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावर झालेली सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. आता सुनील केंद्रेकर यांची राज्याच्या कृषी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील केंद्रेकर हे बीडचे जिल्हाधिकारी होते, तेव्हा त्यांचा थेट जनतेशी संपर्क होता. तेव्हा त्यांनी वाळू माफियांपासून, आरटीओ एजंटपर्यंत सर्वांना वठणीवर आणलं होतं. यानंतर सुनील केंद्रेकर यांची बदली झाली होती. बीडमधून सुनील केंद्रेकरांच्या बदलीसाठी,  तत्कालीन सत्ताधिकारी आमदारांनी बदलीसाठी जोर लावला होता, त्यातील बरेच आमदार आता सत्ताधारी पक्षात आहेत.


बीड जिल्हाधिकारी पदानंतर सुनील केंद्रेकर यांच्या हातात, कृषी विभागासारखा ग्रामीण जनतेशी संबंधित विषय हाती आला आहे. तेव्हा जलयुक्तची कामं आता वरवरची आणि बोगस करणाऱ्यांना मोठा चाप लागण्याची शक्यता वाढली आहे. सुनील केंद्रेकर यांच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेला अजूनही खूप काही अपेक्षा आहेत.