दिव्यात आजपासून काही फास्ट लोकलना थांबा
मध्य रेल्वेच्या फास्ट लोकलमध्ये बसल्यावर `अगला स्टेशन दिवा` अशी अनाऊंसमेंट ऐकलीत तर आश्चर्यचकीत होऊ नका. कारण आजपासून मध्य रेल्वेनं काही गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा दिलाय.
दिवा : मध्य रेल्वेच्या फास्ट लोकलमध्ये बसल्यावर 'अगला स्टेशन दिवा' अशी अनाऊंसमेंट ऐकलीत तर आश्चर्यचकीत होऊ नका. कारण आजपासून मध्य रेल्वेनं काही गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा दिलाय.
दिवावासियांच्या अनेक दिवसांची प्रतिक्षा अखेर आज संपणार आहे. आज सकाळपासून 12 अप आणि 12 डाऊन फास्ट गाड्या दिवा स्थानकात थांबणार आहेत. त्यामुळे दिवावासियांनी केलेल्या आंदोलनाला आज ख-या अर्थानं यश मिळालंय.
दिवा इथं गेल्या अनेक वर्षात वाढलेल्या लोकसंख्येला यामुळे मोठा दिलासा मिळालाय.