मुंबई : अवघ्या दोन तासात झी 24 तासच्या बातमीची दखल घेऊन सपाच्या उमेदवार आयेशा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीनं गोवंडी पोलिसात आयेशा शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुपारी 12च्या सुमारास गोवंडीत प्रभाग क्रमांक 140मध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवार शेख आयेशा पैसे वाटतानाचा व्हिडीओ झी 24 तासवर आम्ही प्रसारित केला होता. त्यानंतर तातडीनं आयोगानं त्याची दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेत. या व्हिडिओमध्ये देवदर्शनासाठी एका ग्रूपला तिने १५ हजार रूपये देत असतानाचा व्हिड़िओ आहे.


पाहा व्हिडिओ