मुंबई : मध्य रेल्वेनं कल्याण आणि पनवेलवरून मॅरेथॉनसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय. रविवारी मुंबईत मॅरेथॉन होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅरेथॉनसाठीच मध्यरेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणहून पहाटे तीन वाजता ही विशेष ट्रेन निघेल, ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे साडेचार वाजता पोहोचेल. 


तर पनवेलवरून पहाटे तीन वाजून दहा मिनिटांनी ही विशेष ट्रेन सुटेल ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे साडेचार वाजता पोहोचेल.