मुंबई : टॅक्सी, रिक्षांच्या २९ ऑगस्टपासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत युनियनमध्ये उभी फूट पडलीये.


 जय भगवान महासंघानं पुकारलेल्या या संपामध्ये सहभागी होणार नसल्याचं टँक्सी-रिक्षा चालक मालक संयुक्त संघर्ष समितीनं जाहीर केलंय... 
 
 मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्यासाठी अजून थोडा वेळ देण्याची गरज असून गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांना वेठीस धरणं बरोबर नसल्याचं युनियनचं म्हणणं आहे. संयुक्त संघर्ष समितीत अकरा संघटना आहेत. 
 
 शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसंग्रामसह इतर संघटनांनी मिळून संयुक्त संघर्ष समिती स्थापन केली आहे. या संघटनांच्या ५० हजारांहून अधिक टँक्सी-रिक्षा आहेत. त्यामुळे सोमवारपासूनच्या बेमुदत संपाचा परिणाम तितकासा जाणवणार नसल्याचं मानलं जातंय...