मुंबई : ग्रामीण भागातील दारूची दुकानं आता गावकुसाबाहेर जाणार आहेत. दुकानांचं गावाबाहेर स्थलांतर करण्याचे आदेश उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. दारुची दुकाने स्थलांतर करण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामसभेचा ठराव झाल्यानंतर वर्षभरात दुकाने स्थलांतर झाले नाहीत तर दुकानाचा परवाना रद्द करणार असल्याचा इशाराही सरकारनं दिलाय. ठराव झाला आणि गावांत एकापेक्षा जास्त दुकाने असतील तर सर्व दुकाने बाहेर थाटावी लागणार आहेत. 


तर मद्य परवानाधारकांना आता केवळ दोनच बाटल्या बाळगता येणार आहेत. यापूर्वी 12  बाटल्या बाळगण्याची मुभा होती. १९७३ च्या कायद्यानुसार  दारूच्या दुकानांचे परवाना वाटप झाले आहे. ही दुकाने गावाबाहेरच होती. 


मात्र कालांतराने वस्ती वाढल्याने ही दुकाने आता गावांमध्ये आली आहेत.   कायदा सुव्यवस्था बिघडल्याच्या तक्रारी महिलांनी केल्यामुळं यासंदर्भातला निर्णय़ घेण्यात आलाय.