मुंबई : इंदू मिलची 12 एकर जागा अखेर वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जमिनीची फाईल हस्तांतरित केली आहे. विधानभवनामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री गैरहजर होते. भाजपच्या तीन मंत्र्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर 2015 ला या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन झालं होतं. मात्र, भूमीपूजन होऊन दीड वर्ष होत आले तरी जमीन हस्तांतरित होत नव्हती. 1400 कोटी रुपये किंमतीच्या या जमिनीच्या बदल्यात राज्य सरकार वस्त्रोद्योग महामंडळाला टीडीआर देणार आहे.