मुंबई : विधिमंडळातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना मिळणार राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळणार आहे. याबाबत विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेतील मुख्य प्रतोदांना लाल दिव्याची गाडी आणि बंगला मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य प्रतोदांना यापुढे राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळणार असला तरी याचा लाभ हा फक्त सत्ताधारी पक्षाच्याच मुख्य प्रतोदांना मिळणार आहे. मुख्य प्रतोदांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा मिळणार असल्यामुळे राज्यमंत्र्यांना मिळणारी लाल दिव्याची गाडी, बंगला, कर्मचारी वर्ग आणि इतर  सर्व सोयीसुविधा मुख्य प्रतोदांना मिळणार आहे. विधानसभेत यासंदर्भातील विधेयक संमत करण्यात आले.


याचा फायदा विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहित आणि शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील  प्रभू, तर विधानपरिषदेतील भाजपाचे मुख्य प्रतोद भाई गिरकर आणि शिवसेनेच्या मुख्य प्रतोद निलम गोऱ्हे यांना मिळणार आहे. सत्ताधारी पक्षातल्यांना लाल दिव्याची गाडी देऊन त्यांची राजकीय सोय लावण्याचा आणखी एक मार्ग यामुळे सत्ताधारी पक्षाला मिळाला आहे. 


ठळक बाबी...


- विधिमंडळातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना मिळणार राज्यमंत्री पदाचा दर्जा 
- विधानसभा आणि विधानपरिषदेतील मुख्य प्रतोदांना मिळणार लाल दिव्याची गाडी आणि बंगला
- राज्यमंत्र्यांना असलेल्या सर्व सुविधाही मिळणार
- विधानसभेत मंजूर झाले विधेयक 


यांना मिळणार लाल दिवा


भाजप - विधानसभातील मुख्य प्रतोद राज पुरोहित,  विधान परिषदेतील भाई गिरकर यांना मिळणार राज्यमंत्रीपदाचा दर्जा


शिवसेना - विधानसभा सुनील प्रभू आणि विधानपरिषद निलम गो-हे यांना मिळणार राज्यमंत्रीपदाचा दर्जा