मुंबई : अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्यावतीनं आंदोलनं करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा देण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महसूल मंडळाची पुनर्रचना करणं, ७/१२ संगणकीकरण त्याचप्रमाणे इ-फेरफार ऑन लाईनचे सोफ्टवेअर दुरुस्त करणे, तलाठी मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणं या प्रमुख मागण्या त्यांनी शासनाकडे केल्यात. या मागण्यांकडे शासनानं लक्ष दिलं नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यातील तलाठी आणि मंडळ अधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन केलं. 


जर शासनानं मागण्या तत्काळ मान्य केल्या नाही. तर २६ एप्रिलपासून संपूर्ण राज्यातील तलाठी मंडळ अधिकारी बेमुदत संपावर जातील असा इशारा महासंघानं दिलाय.