मुंबई : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ०५ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०१६ या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयके आणि विधान परिषदेतील सहा प्रलंबित विधयेकांवर चर्चा होणार आहे, चार नवीन आणि ११ प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळात झाली. 


यावेळी विधानसभेतील बैठकीस विरोधी पक्ष नेत्यांसह विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव यु.के. चव्हाणही उपस्थित होते.


या बैठकीत विधीमंडळाचे अधिवेशन दोन आठवड्याचे ठेवण्याचे ठरविण्यात आले. ०५ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत विविध विधेयके, शासकीय कामकाजावर चर्चा होणार आहेत. 


तसेच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त विशेष चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी दिली.