मुंबईतल्या एका मोठ्या रेल्वे प्रकल्पाला नीती आयोगाची मंजुरी
मुंबईतल्या एका मोठ्या रेल्वे प्रकल्पासाठी नीती आयोगानं मंजुरी दिली आहे. विरार- वसई-पनवेल या मार्गाला आयोगानं मंजुरी दिलीय. या प्रकल्पासाठी ९ हजार ३५६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबई : मुंबईतल्या एका मोठ्या रेल्वे प्रकल्पासाठी नीती आयोगानं मंजुरी दिली आहे. विरार- वसई-पनवेल या मार्गाला आयोगानं मंजुरी दिलीय. या प्रकल्पासाठी ९ हजार ३५६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
७०. १४ किमीचा हा भव्य प्रकल्प आहे. चर्चगेट ते विरार, सीएसटी ते पनवेल आणि सीएसटी ते कल्याण या तिन्ही मार्गांपेक्षा हा मोठा मार्ग आहे. या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च राज्य सरकार आणि ५० टक्के रेल्वे करणार आहे. नीती आयोगाच्या मंजुरीनंतर आता पंतप्रधानांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.