मुंबई : आता एक धक्कादाय़क बातमी...दहिसरमधील कृष्णा वाटीका सोसायटीत भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. याप्रकरणी सोसायटीतील राजेश वर्माविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहिसर पूर्व आनंदनगर येथील कृष्णा वाटिका सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे. या सोसाटीत असलेले भटके कुत्रे विष कालवेलंलं अन्न खाताना दिसत आहेत.


हो विष कालवलेलं अन्न, या सोसाटीत गेल्या काही दिवसांपूर्वी २०  ते २५  कुत्रे होते. मात्र त्यांची संख्या आता 3 वर आलीय. मात्र या कुत्र्यांचा मृत्यू कशामुळे होतोय असा प्रश्न येथील नागरिकांना पडला होता. यासाठी सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.


त्या सीसीटीव्हीत हे धक्कादायक कृत्य समोर आलं..सोसायटीतील राजेश वर्मा हा व्यक्ती अश्याप्रकारे विष कालवलेलं जेवण कुत्र्यांना देत असल्याच वास्तव समोर आलं. याविरोधात सोसायटीतील नागरिकांनी पोलिसांत तक्रार नोंदवलीय. 


याच भटक्या कुत्र्यांनी 2014 मध्ये चड्डी बनियान गँगपासून येथील नागरिकांचं संरक्षण केलं होतं. त्या मुक्या जनावरांचा अश्याप्रकारे जीव घेतला जात असल्याने सोसायटीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.