मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जीएसटीविषयी घेतेल्या आक्षेपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मातोश्री बंगला गाठला. पण त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण सकाळाच्या चर्चेतून उद्धव ठाकरेंचं समाधान झालेलं दिसत नाही. रात्री दहा वाजता मातोश्रीवर पुन्हा एकदा बैठक होणार आहे.   


मुंबई महापालिका सात हजार कोटी रुपयाचं जकात उत्पन्न नष्ट होणार आहे. त्याची पूर्ण नुकसान भरपाई राज्य सरकार देईल असं अर्थमंत्र्यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांना सांगितलयं.  


त्याविषयीची तरतूद कायद्यात करण्यात येणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी म्हटलंय. शिवाय उद्धव ठाकरेंच्या सूचनांवर सकारात्मक चर्चा करून कायदेशीर तरतूद केली जाईल, असंही आश्वासन देण्यात आलं. 


या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेसह मातोश्रीवर उपस्थित होते.