अशोक चव्हाण, संजय निरुपम यांच्यामुळेच आघाडी तुटली, तटकरेंचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळेच मुंबईतील आघाडीची शक्यता संपली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलाय.
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळेच मुंबईतील आघाडीची शक्यता संपली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलाय.
मुंबईचे शहर अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अट्टाहासामुळे ही आघाडी होवू शकली नाही असा आरोप सुनिल तटकेर यांनी केलाय. त्यामुळे आमच्या दृष्ट्रीने आघाडी हा विषय संपला असं मत सुनिल तटकरे यांनी जाहिर केलं.
तर मुंबई महानगरपालिकेत सेना आणि भाजपची युती व्हावी अशी आमची इच्छा आहे ही युती झाल्यास त्याचा फायदा आम्हालाच होईल असं मत सुनिल तटकरे यांनी व्यक्त केलय.