नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरण, कबीर कला मंचच्या तीन कार्यकर्त्यांना जामीन
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून गेल्या साडे तीन वर्षांपासून तुरूंगात असलेल्या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना सुप्रीम कोर्टानं अखेर जामीन मंजूर केलाय.
मुंबई : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून गेल्या साडे तीन वर्षांपासून तुरूंगात असलेल्या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना सुप्रीम कोर्टानं अखेर जामीन मंजूर केलाय.
त्यामुळं सचिन माळी यांच्यासह तिघांना मोठा दिलासा मिळालाय. याच प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल साठेला यापूर्वीत जामीन मिळाला होता. मात्र इतर तिघांचा जामीन मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावला होता. त्यामुळं या तिघांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
सचिन माळी सध्या मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये आहे, तर सागर गोरखे आणि रमेश गायचोर हे दोघे तळोजा जेलमध्ये आहेत. नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याचा यांच्यावर आरोप आहेत. मे 2013 मध्ये या सर्वांनी विधीमंडळासमोर आत्मसमर्पण केले होते.