इंदिरानगरमधल्या १२० झोपड्या पाडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
जोगेश्वरीतील इंदिरानगरमधल्या १२० झोपड्या पाडण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेत. आजपासून या झोपड्या पाडण्यात येणार आहेत. ही जागा रेल्वेची असल्याचं कोर्टानं सांगितलं. या निर्णयानंतर जोगेश्वरीतील रहिवाशांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
मुंबई : जोगेश्वरीतील इंदिरानगरमधल्या १२० झोपड्या पाडण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेत. आजपासून या झोपड्या पाडण्यात येणार आहेत. ही जागा रेल्वेची असल्याचं कोर्टानं सांगितलं. या निर्णयानंतर जोगेश्वरीतील रहिवाशांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
झोपडपट्टी कायद्याअंतर्गतची ओळखपत्रं रहिवाशांकडे आहेत. १९७० पासून रहिवासी येथे राहतात. तरीही कोर्टाने ग्राह्य धरलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे पुनर्वसन करावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.