मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात भाजपनं हुतात्मा चौकात जाऊन केली. यावेळी भाजपच्या सगळ्या उमेदवारंनी हुतात्मा चौकात पारदर्शकतेची शपथ घेतली. भाजपच्या या पारदर्शकतेच्या शपथेचा उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हुतात्मा स्मारकावर जाऊन अखंड महाराष्ट्राचीही शपथ घ्या, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला केलं आहे. भांडूपमध्ये झालेल्या प्रचारसभेमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.


पाहा उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


15 दिवसांमध्ये मित्रौ वगैरे ऐकायला मिळेल ते एका कानानं ऐकायचं, नाही ऐकलं तरी चालेल


पारदर्शकता तुम्हाला दिसली नाही तरी तुमच्या मायबापांना दिसली, केंद्रानं मुंबई महापालिकेला पारदर्शकतेचं सर्टिफिकेट दिलं


पारदर्शकतेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री, राज्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि पत्रकारांना बोलवा


जी काम केली ती ठणठणीत आणि ठसठशीत प्रकारे दाखवली आहेत


काहींना मुंबईकर असल्याचं सांगावं लागतं


लिंक रोडला जोडणारा रस्ता पाच वर्षांमध्ये करणार, भांडूपमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करणार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार


मुंबई महापालिकेचं वीज निर्मिती केंद्र कोणासाठी अडवून ठेवलं ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं


बेस्टनं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करणार


सामान्य माणसाच्या खिशातले पैसे घेणारे तुम्ही पाकीटमार आहात


लाच घेताना तुमचा अध्यक्ष पकडला जातो त्यांना पारदर्शकतेविषयी बोलताना लाज वाटत नाही का?