४० हजार रुपयांची लाच घेताना अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्तांना अटक
अन्न व औषध प्रशासन, झोन ५ चे सहाय्यक आयुक्त प्रविण मुंधडा यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ४० हजार रुपयांची लाच घेताना बीकेसी येथील त्यांच्या कार्यालयात पकडले.
मुंबई : अन्न व औषध प्रशासन, झोन ५ चे सहाय्यक आयुक्त प्रविण मुंधडा यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ४० हजार रुपयांची लाच घेताना बीकेसी येथील त्यांच्या कार्यालयात पकडले.
तक्रारदाराच्या मेडीकल दुकानाला अचानक भेट दिली असता मेडीकलमध्ये लायसन्स प्राप्त व्यक्ती नसल्याने तक्रारदाराचे लायसन्स रद्द करण्यात आले होते.
या लायसन्सवरील बंदी उठवून लायसन्स पुन्हा वापरण्याकरिता देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, झोन ५ चे सहाय्यक आयुक्त प्रविण मुंधडा यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती.
या लाचपैकी ४० हजार रुपये स्वीकारताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अन्न व औषध प्रशासन, झोन ५ चे सहाय्यक आयुक्त प्रविण मुंधडा यांना रंगेहाथ पकडले.