मुंबई लोकलमध्ये महिला डब्ब्यात टॉकबॅक प्रणाली
लोकलनं प्रवास करणा-या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी. लोकलनं प्रवास करणा-या महिलांचा प्रवास आता आणखी सुरक्षित करण्यासाठी रेल्वेनं पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : लोकलनं प्रवास करणा-या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी. लोकलनं प्रवास करणा-या महिलांचा प्रवास आता आणखी सुरक्षित करण्यासाठी रेल्वेनं पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई मेट्रोच्या धर्तीवर लोकल ट्रेनमध्ये महिला डब्ब्यात टॉकबॅक प्रणाली बसवण्यात येणार आहे. या टॉकबॅकमुळे महिलांना आपत्कालीन परिस्थितीत थेट गार्डशी संपर्क साधता येणार आहे. यामुळे महिलांना संकटसमयी तात्काळ मदत मिळणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर पश्चिम रेल्वेच्या 2 लोकलमधील महिलांच्या सहा डब्ब्यात टॉकबॅक यंत्रणा बसवण्याचं काम सुरु झालंय. मार्च महिन्यापर्यंत ही सेवा प्रत्यक्ष कार्यरत होईल. या सर्व प्रणालीसाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.