मुंबई : मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्व पदावर येत आहे. घाटकोपर स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या तांत्रीक बिघाडामुळे गाड्यांचं वेळापत्रक मात्र कोलमडले. गाड्या 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. घाटकोपर स्टेशनातील 1 आणि2 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.


या धीम्या मार्गांवरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आल्याने त्याचा फटका 'फास्ट लोकल'नाही बसला. सरकारी कार्यालयं आणि बँकांना 'सेकंड सॅटर्डे'ची सुटी असल्यानं गर्दी नसली तरी खासगी कार्यालय सुरु असल्याने या कर्मचाऱ्यांना  त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.