मुंबईत पारा घसरला, मुंबईकरांना यंदा अनुभवता येणार गुलाबी थंडी
यंदा दिवाळीत मुंबईकरांना किमान दशकभरापूर्वीच्या दिवाळीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबईचा पारा घसरलाय. आज पहाटे साडे पाच वाजता मुंबई आणि उपनगरात किमान तापमान वीस अंशाच्या खाली गेला. तर इकडे कुलाब्यातही पारा 25च्या खाली गेला आहे.
मुंबई : यंदा दिवाळीत मुंबईकरांना किमान दशकभरापूर्वीच्या दिवाळीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबईचा पारा घसरलाय. आज पहाटे साडे पाच वाजता मुंबई आणि उपनगरात किमान तापमान वीस अंशाच्या खाली गेला. तर इकडे कुलाब्यातही पारा 25च्या खाली गेला आहे.
दहा वर्षांपूर्वी दिवाळीच्या दिवसांमध्ये पहाटेच्या अभ्यंग स्नानाला गुलाबी थंडी पडत असे. पण वाढतं प्रदुषण आणि वातवरणातील बदल यामुळे दिवाळीत काळात थंडी पडणं लोक विसरून गेले होते. यंदा पुन्हा एकदा तोच योग जुळून आला आहे. येत्या दोन तीन दिवसात पारा आणखी खाली गेला. तर नोव्हेंबरची सुरुवात मुंबईत गुलाबी थंडीनं होणार याबद्दल शंका नाही.