मुंबई :  मुंबईत पारा कमालीचा वाढलाय. त्यामुळे नागरिकांच्या घामाच्या धारा गळतायत. उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागरिक शीतपेय, ताक घेत असल्याचे पाहायला मिळतेय..  तर काहीजण छत्री, रूमाल वापरुन स्वतःचं उन्हापासून संरक्षण करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी सर्वात जास्त कमाल तापमान 43 अंश इतकं भिरा इथं नोंदवण्यात आलं. 


विदर्भातही सर्वत्र पारा 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त होता. यापुढे दोन तीन दिवस विदर्भात पारा 40 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. 


तर मुंबईतही पारा चढाच राहण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळा संचालिका शुभांगी भुत्ते यांनी वर्तवलाय.  मुंबईत आजचे तापमान ३४ अंश सेल्सियस होते. पुढील तीन दिवस ३८ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. 


पुढील दोन दिवस सर्वांसाठी तापदायक ठरणार आहेत.. राज्यात खास करुन मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भ आणि गोव्यात येत्या दोन ते तीन दिवसांत तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये.. 


पूर्वीकडून येणा-या उष्ण वा-यांमुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.. महाराष्ट्र विदर्भ वगळता बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून तापमानत घट होताना दिसत होती. 


मध्य महाराष्ट्रातील उष्णतेची लाट मागील आठवड्यातच ओसरली होती. मात्र विदर्भातील तापमान काही घटलं नव्हतं.. त्यात आता  पुन्हा पारा २ ते 3 अंशांनी चढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी.. शक्यतो दुपारी 11 ते 2च्या सुमारास घराबाहेर पडणं टाळा असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.