हवाईमार्गे मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता
मुंबईवर हवाई मार्गानं अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत पोलिसांनी ड्रोन उडवणे.
मुंबई : मुंबईवर हवाई मार्गानं अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत पोलिसांनी ड्रोन उडवणे.
पॅरा ग्लायडिंग आणि पॅराशूट उडण्यावर बंदी आणलीये. कारण या मार्फत मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तविलीये. त्याआधारे मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी केलंय.
मुंबईवर ड्रोन हल्ला होण्याची शक्यता या परिपत्रकात वर्तवण्यात आलीये. ५ एप्रिल ते ५ मे या दरम्यान हा हल्ला होण्याची शक्यता असल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे मुंबई परिसरात ड्रोन किंवा पॅराशूट उडवले तर त्या व्यक्तीवर कलम १८८ नुसार कारवाई केली जाईल असे आदेश या परिपत्रकाद्वारे मुंबई पोलिसांनी दिलेत.