मुंबई : बोरीवलीतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सकाळी अपघात झाला. कान्हेरी गुहांमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमाराला आलेली बस पलटली. बसमध्ये २५ प्रवासी होती. यातले सुमारे १० प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयांत त्यांना दाखल करण्यात आलंय. शनिवारी, रविवारी नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांची संख्या मोठी असते. 


पर्यटनासाठी आलेल्या २५ पर्यटकांना घेऊन एक बस कान्हेरी गुंफांकडे चालली होती. त्यावेळी चढावर गाडी असताना गिअर अडकल्याने बस पलटी झाली. यामध्ये १० जण जखमी झाले. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला.