मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्या घोषणा खोट्या असल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रॉपर्टी टॅक्स हा महापालिका अधिनियम आहे तो रद्द करण्यासाठी विधानसभेची मंजूरी लागेल असं देशपांडे यांनी म्हटलंय. तर भाजपच्या आधीच्या घोषणांचं काय झालं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 


मुंबई महापालिकेतल्या जागावाटपावरून आधीच युतीमध्ये घमासान सुरू आहे. त्यात आता घोषणांवरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण सुरू झालंय. शिवसेना पुन्हा सत्तेत आली तर मुंबईतल्या 500 चौरस फुटांच्या घरांवर मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे तर 700 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करामध्ये सवलत मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध होण्याआधीच ही घोषणा केली आहे. 


निवडणुकीच्या तोंडावर मध्यमवर्गीयांना खूष करण्यासाठी शिवसेनेनं हा रामबाण सोडल्यानं भाजपवाले गडबडून गेलेत. राज्य सरकारकडे मी आमदार म्हणून मागणी केली होती. या सगळ्यानंतर आता काही जणांना उपरती होतेय आणि ते बोलतायेत, असा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय.