मुंबई :  पोलीस निरीक्षक पत्नीच्या हत्येचा उलगडा झाला आहे. मुलानेच आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपाली गणोरे हत्या प्रकरणात मुलगा सिद्धांत याला पोलिसांनी ताब्यात घेतलं गेले आहे.  जोधपूर पोलिसांनी ही कारवाई केली. मंगळवारी झालेली दीपाली गणोरेची हत्या कोणी केली याबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. तसेच मुलगा बेपत्ता असल्याने हत्या कोणी केली, याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत होते.


प्रगतीपुस्तक मागितले म्हणून दीपाली गणोरे यांची हत्या केल्याची कबुली मुलगा सिद्धांत याने पोलिसांना दिली आहे. आईशी झालेल्या वादांतूनची ही हत्या केल्याचं सिद्धांतनी म्हटले आहे. दीपाली गणोरे यांचे हत्येनंतर सिध्दांत बेपत्ता होता. सिद्धांतला आज जोधपूर पोलिसांनी अटक केली आहे. 


मंगळवारी दीपाली गणोरे यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली होती, त्यांच्या मृतदेहाच्या बाजूला सिद्धांतने रक्ताने टायर्ड ऑफ हर, कॅच मी , हँग मी असं लिहून ठेवलं होतं. हत्या केल्यानंतर तो रेल्वेने सूरतमार्गे जोधपूरला पोहचला. मरेल्वे स्टेशनजवळच्या हॉटेल धूममधून त्याला ताब्यात घेण्याच आलं. मुलानेच आईची चाकूने हत्या केल्याची ही निर्घृण घटना आहे. 


सिद्धांतचे वडील पोलीस निरीक्षक असून, ते शिना बोरा प्रकरणाच्या चौकशी पथकामध्ये होते. सिद्धांत हा बारावी पास झाल्यानंतर इंजिनिअरिंग करत होता, मात्र त्याने मध्येच इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडले होते आणि तो बीएसस्सी करत होता.