मुंबई : राज्यात पोलीस कारवाईत जप्त करण्यात आलेल्या नोटांबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. राज्यात पोलिसांकडे कित्येक लाखो रुपये आहेत. 500, 1000च्या नोटा चलनातून रद्द झाल्याने पोलिसांकडील पैशांचे करायचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पोलीस कारवाईत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी निवडणूक आचारसंहिता असताना लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच लाचलुचपत अधिकाऱ्यांनीही कारवाई करताना रोकड जप्त केली होती. राज्यात जवळपास कोट्यवधी किमतीची नोटा आहेत.  30 डिसेंबरपर्यंत 500, 1000 रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत आहे. त्यानंतर या नोटा कागद होणार आहे. त्यामुळे पुराव्यासाठी पोलिसांकडे लाखो रुपयांच्या नोटा आहेत.


पोलिसांनी जप्त केलेले पैस कोठे असतात?


- पोलिसांच्या ताब्यातील नोटांचा निर्णय न्यायालय घेणार
- पोलिसांच्या नियमानुसार जप्त करण्यात आलेला मुद्दे माल पोलिसांच्या कोषागारात जमा केला जातो
- त्याची रितसर नोंदणी केली जाते
- त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजार केल्यानंतर पुरावा म्हणून या नोटा न्यायालयात सादर करण्यात येतात
- सापळा रचून आरोपीला पकडताना काही वेळेला खोट्या नोटांचा ही आधार घेतला जातो
- एका विशिष्ठ पद्धतीने या नोटांना पावडर लावली जाते त्यामुळे आरोपीच्या बोटांचे ठसे या नोटांवर असतात
- त्या नोटा मुख्य पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात येतात
- यासंदर्भातील खटला न्यायालयात सुरू असेपर्यंत त्या नोटांचे जतन करण्यात येते
- मात्र बेहिशेबी नोटा जप्त करण्यात आल्यानंतर हा मुद्देमाल पोलिसांच्या कोषागारात असतात
- तसेच न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर न्यायालय या रकमेबाबत निर्णय घेत असते.