मुंबई : नालासोपारा येथे प्रियकराने प्रेयसीवर आणि तिच्या मुलावर धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर स्वत:वरही त्यांने वार करुन घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेत प्रेयसी तिचा मुलगा आणि वार करणारा प्रियकर असे तिघेही जखमी झालेत. नालासोपारा पूर्व संतोष भुवन डोंगरी, पांडुरंग कदम चाळीत ही घटना घडली.


योगेश खांबे असे आरोपी प्रियकाराचे नाव आहे. तुलिंज पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर योगेश खांबे याला अटक केली. तर जखमींना वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.