कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज विधीमंडळाचे कामकाज ठप्प
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज विधीमंडळाचं कामकाज ठप्प आहे. गेल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेल्यावर आता तोडगा काढण्यासाठी आज सरकारनं बोलावलेली गटनेत्यांची बैठकही निष्फळ ठरली.
मुंबई : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज विधीमंडळाचं कामकाज ठप्प आहे. गेल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेल्यावर आता तोडगा काढण्यासाठी आज सरकारनं बोलावलेली गटनेत्यांची बैठकही निष्फळ ठरली.
विरोधकांनी आजही विधीमंडळाच्या परिसारात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधक आक्रमक राहिले. त्यामुळे कामकाज दोन वेळा अर्ध्यातासासाठी तहकूब करण्यात आले.
आजच्या आंदोलनात शिवसेनेच्या आमदारांचा मात्र सहभाग नव्हता. गेल्या आठवड्यात सेनेची साथ मिळाल्याने विरोधक चांगलेच आक्रमक होते. आज मात्र सेना मवाळ झाल्याने विरोधकांच्या टीकेची धारही काहीशी बोथट झाल्याचं दिसत होती.
दरम्यान, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी या प्रामाणिक मागणीसाठी शिवसेनेचे आमदार सरकारविरोधात उभे राहिल्याचं उद्धव ठाकरेंनी आज म्हटलं आहे.