२६/११ हल्ल्यावेळी सिद्धिविनायक मंदिर मुख्य टार्गेट, हेडलीचा खळबळजनक गौप्यस्फोट
२६/११हल्ल्यावेळी सिद्धिविनायक मंदिर हेच मुख्य टार्गेट होते, असा डेव्हिड हेडलीने गौप्यस्फोट साक्षीदरम्यान केलाय.
मुंबई : २६/११हल्ल्यावेळी सिद्धिविनायक मंदिर हेच मुख्य टार्गेट होते, असा डेव्हिड हेडलीने दुसऱ्या दिवशी खळबळजनक गौप्यस्फोट साक्षीदरम्यान केलाय. पाक लष्कारच्या बड्या अधिकाऱ्यांनाही हेडलीने कोर्टात ओळखले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा पुन्हा एकदा बुरखा फाटलाय.
२६/११ मुंबईवरील हल्ला करण्यापूर्वी मुंबईची रेकी करताना साजिद मीरने मला सिद्धीविनायक मंदिराची पाहणी करण्याची विशेष सूचना केली होती. तसेच ताज महाल हॉटेलशिवाय ओबेरॉय हॉटेल, मुंबई पोलीस मुख्यालय, नौदल व वायुदलाचीही पाहणी केली, अशी माहिती हेडली यांनी साक्षीदरम्यान दिलेय.
मी २००७ साली अनेक वेळा ताज हॉटेलची रेकी केली. पाकच्या लष्करच्या साजीद मीरने मला रेकी करण्यास सांगितले. त्यानंतर मी ताज हॉटेलचे केलेले व्हिडीओ शूटिंग, फोटो पाहून साजीद मीर, मेजर इक्बाल समाधानी होते. तसेच मी कुलाब्यातील भगत सिंग मार्ग, लिओपोल्ड कॅफे, कुलाबा पोलीस स्टेशनसह त्या मार्गावरील अनेक दुकाने आणि रेस्टॉरंट्सचेही व्हिडीओ शूटिंग केले होते, असे डेव्हिड हेडलीने चौकशी दरम्यान सांगितले.
दरम्यान, मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांची रेकी करताना मीर साजिद व अबू खफाने मला जीपीएस डिव्हाईस दिला होता, अशी धक्कादायक माहिती हेडली याने दिली.