मुंबई : राज्यातील डान्सबार बंद करण्याच्या नवीन कायद्याला आज विधान परिषदेत मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे या विधेयकावर चर्चा न करता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डान्सबार विषयी अधिनियम २०१६
महाराष्ट्र हॉटेल रेस्टोरेंट व बार रूममध्ये चालणाऱ्या अश्‍लील नृत्यावर प्रतिबंध आणि त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणाबाबत अधिनियम २०१६ 


मसुद्यातील काही तरतुदी -
डान्सबारमध्ये महिला आणि इतर कर्मचारी यांच्या नावाने भविष्य निर्वाह निधी योजना सुरू करणे अनिवार्य
डान्सबारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने नोंद आवश्‍यक, तसेच कर्मचारी याची तपशीलवार माहिती बार मालकाकडे असणे आवश्‍यक 
डान्सर (नर्तक/नर्तिका) यांच्यावर पैसे उधळण्यास मनाई, नर्तक/नर्तिकेच्या गुणगौरवासाठीचे हे पैसे बिलातून चुकते करावे लागतील 
बार रूम सायंकाळी सहा ते रात्री ११.३० या वेळेतच सुरू राहणार. 
प्रत्येक बारसाठी किमान तीन महिला सुरक्षारक्षक असावेत, त्या महिला कर्मचाऱ्यांना घरापर्यंत सुरक्षित पोचता यावे याचीही व्यवस्था करण्यात यावी, आवश्‍यक असेल तर पाळणाघराची सुविधाही द्यावी 
परमिट रूम आणि नृत्य कक्ष यामध्ये पक्की विभाजक भिंत असेल 
मंच हा सर्व बाजूंनी तीन फूट उंचीचा कठडा घालून अलग करण्यात यावा 
कठडा आणि ग्राहक बैठक क्षेत्र यामध्ये पाच फुटांचे अंतर असेल 
ग्राहकाने ठराविक अंतर पार करू नये, यासाठी कमीत कमी सहा इंच उंचीचा कठडा असेल 
एका मंचावर केवळ चार नर्तिका/नर्तक/कलाकार यांना नृत्यविष्कारची परवानगी 
नर्तक/नर्तकीचे वय किमान 21 वर्षे असावे 
सार्वजनिक क्षेत्र या व्याख्याअंतर्गत येणाऱ्या बारमधील जागेत सीसीटीव्ही अनिवार्य आणि ३० दिवसांचे रेकॉर्ड ठेवणे आवश्‍यक