खडसेंकडे नगरसेवक आहेत, आमदार कुठे आहेत?
शिवसेना-भाजप विरोधात असताना सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकी नऊ आणणारे, एकनाथ खडसे आता भाजप सत्तेत आल्यानंतर अडचणीत आले आहेत. खडसेंसाठी जळगाव महापालिकेचा १५ नगरसेवकांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली असली, तरी खडसेंसाठी अजून पाहिजे तेवढ्या प्रमाणात आमदार समर्थक दिसून येत नाहीत, ही खडसे यांच्यासाठी चिंतेची बाब आहे.
मुंबई : शिवसेना-भाजप विरोधात असताना सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकी नऊ आणणारे, एकनाथ खडसे आता भाजप सत्तेत आल्यानंतर अडचणीत आले आहेत. खडसेंसाठी जळगाव महापालिकेचा १५ नगरसेवकांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली असली, तरी खडसेंसाठी अजून पाहिजे तेवढ्या प्रमाणात आमदार समर्थक दिसून येत नाहीत, ही खडसे यांच्यासाठी चिंतेची बाब आहे.
काही दिवसांपूर्वी खडसे यांच्या निकटवर्तीयावर लाचखोरीचे आरोप झाले. यानंतरही खडसे आऱोप फेटाळताना आक्रमक दिसले नाहीत, किंवा त्यांच्या मदतीला भाजपचा कोणताही नेता धावून आला नाही. यातच खडसे यांची लिटमस टेस्ट झाली.
खडसेंच्या लिटमस टेस्टमध्ये खडसेंकडे पाठिंबा देणारे नेते, आमदार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर, खडसेंवर भ्रष्टाचाराचे एकानंतर एक बॉम्ब येऊन पडले.खडसेंना खिंडीत गाठण्याची त्यांची त्यांच्या विरोधक आणि पक्षांतर्गत विरोधकांसाठी योग्य वेळ असावी, म्हणून खडसेंवर हे टायमिंग साधलं जात असावं अशी चर्चा आहे.
खडसेंनी लाचखोरी प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असती, तर खडसेंवर ही वेळ आली नसती, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.