मुंबई : शेतमालाची थेट विक्रीची परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शेतकरी शेतातील शेतमाल थेट शहरांमध्ये विक्रीला आणत आहेत, जो पिकवतोय, तोच विकतोय अशी परिस्थिती आहे. पण या परिस्थितीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत तोटा सहन करणारा शेतकरी पहिल्यांदा हसतमुखाने घरी दोन पैसे घेऊन जाताना दिसतोय. काही ठिकाणी भाजीपाला पोहचत नसला, तरी काही दिवसानी ही परिस्थिती देखील सुरळीत होणार आहे. शेतकरी पहिल्यांदा बाजारात थेट उतरलाय, त्यामुळे सर्वत्र ग्राहकांच्या जवळ पोहोचण्याचा त्याचा प्रयत्न आहे, यासाठी आणखी काही वेळ जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


शेतकरी आपल्या भाजीपाल्याचे ट्रक थेट शहरांमध्ये आणून तेथेच स्टॉल थाटतायत, काही तासात भाजीपाला विक्री होतोय, ग्राहकांनाही पहिल्यापेक्षा कमी भावात भाजीपाला मिळतोय, आणि शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळतोय, मधल्या दलालांनी शेतकऱ्याला किती नागवला होता, हे समोर येतंय, त्यामुळे काही दिवस भाजीपाल्याचा तुटवडा असला तरी सहन करण्याची तयारी ग्राहकांनी दाखवली आहे. 


मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात दुष्काळ असल्याने, भाजीपाल्याचं उत्पन्न कमी झालं आहे, यामुळे देखील भाजीपाल्याचं भाव वाढले आहेत.