मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. विविध मंडळांनी गणेश मूर्त्या मंडपात आणण्यासही सुरुवात केलीये. सोशल मीडियावरही गणपतीच्या आगमनाची जोरदार चर्चा सुरुये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणपतीच्या दिवसांत म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांचे मेसेज सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुकवर व्हायरल होतोय. अनेकजण आरत्यांमधील शब्द चुकीचे उच्चारतात. 


याबाबतीचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. गणपती आरती म्हणतात वाट पाहे सदनाच्या ऐवजी वाट पाहे सजणा असे उच्चारले जाते. 



 अजूनही वेळ गेलेली नाही ,
१० दिवस शिल्लक आहेत.
.
.
.
.
.
.
सर्व आरत्या ऐकदा डोळ्यासमोरुन घालवा, नाहीतर दर वर्षी प्रमाणे आरती सुरू झाली कि ऐकमेकांच्या तोंडावर बघत बसाल.


------------------------------------------


चूक – ओटी शेंदुराची
बरोबर – उटी शेंदुराची


चूक – संकष्टी पावावे
बरोबर – संकटी पावावे


चूक – वक्रतुंड  त्रिमेना
बरोबर – वक्रतुंड त्रिनयना


चूक – दास रामाचा वाट पाहे सजणा
बरोबर – दास रामाचा वाट पाहे सदना


चूक – लवलवती विक्राळा
बरोबर – लवथवती विक्राळा


चूक – ओवाळू आरत्या सुरवंट्या येति
बरोबर – ओवाळू आरत्या कुरवंड्या येति


चूक – लंबोदर पितांबर फळीवर वंदना
बरोबर – लंबोदर पितांबर फणिवर वंदना