मुंबई : सध्या एक हजार रुपयांची नवी नोट सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. ही नवी नोट खरंच छापण्यात आली आहे की, ही मॉर्फ केलेली, म्हणजेच फोटोशॉपवर बनवलेली आहे का? याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समजू शकलेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आता ही नवी नोट सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असल्यानं 1000ची नोट बाजारात येणार का? याबाबत चर्चा रंगू लागली आहे.


नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्याआधी 2000 रुपयांची नवी नोट अशीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता एक हजाराची नोटही सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्यामुळे ही नोट बाजारात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर १०००ची नवी नोट चलनात येणार असल्याचे केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी जाहीर केलं होतं. पण त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटलींनी त्यांचा हा दावा नाकारला होता. तूर्तास तरी 1000ची नवी नोट बाजारात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.