मुंबई: मुंबईत पुन्हा छमछम सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डान्सबारना परवानगी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी तीन बारना परवानगी दिलीय. पुढच्या महिन्यात हे बार सुरू होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियाना, एरो पंजाब आणि साई प्रसाद अशी या तीन डान्स बारची नावं आहेत. तर बाकीच्या पाच डान्सबारना रक्कम दिल्यानंतर परवानगी देण्यात येणार आहे. 8 बारना 12 मे पर्यंत परवाने देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.