आग विझवण्यासाठी 10 लाख 78 हजार लीटर पाण्याचा वापर
देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल 10 लाख 78 हजार पिण्याचं पाणी वापरण्यात आल्याचं समोर आलंय. आग लागल्यानंतर देवनार कत्तलखाना आणि आरसीएफमधून लाखो लीटर पिण्याचं पाणी आणण्यात आलं आणि त्याच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली.
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल 10 लाख 78 हजार पिण्याचं पाणी वापरण्यात आल्याचं समोर आलंय. आग लागल्यानंतर देवनार कत्तलखाना आणि आरसीएफमधून लाखो लीटर पिण्याचं पाणी आणण्यात आलं आणि त्याच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली.
महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना आग विझवण्यासाठी पिण्याचं पाणी का वापरण्यात आलं, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
आग विझवण्यासाठी शुद्धीकरण, प्रक्रिया न केलेलं पाणी किंवा विहीरीतलं पाणीही वापरता आलं असतं, असं बोललं जातंय. मात्र आग विझवणं हे प्राधान्य असल्यानं ताबडतोब उपलब्ध होणारं पाणी वापरण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.