मुंबई : वाहतूक पोलिसांनी नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचं ठरवलयं. मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांच्या माध्यमातून आता नियम मोडणा-यांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्याच बरोबर वाहन चालकांना भेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी एक अॅपही लाँच करण्यात आल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहतुकीचे नियम मोडणा-यांनो सावधान.


आता मुंबई वाहतूक पोलिसांची तुमच्यावर करडी नजर असणार आहे. सीसीटीव्हिच्या माध्यमातून मुबंई वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी सज्ज आहेत. सीसीटीव्हीमध्ये नियम मोडणा-या वाहनाचा फोटो घेतला जाणार आहे तर वाहनचालकाने कोणत्या नियमांच उल्लंघन केलयं, त्यावर त्याला काय दंड अथवा शिक्षा होऊ शकते या सगळ्याची माहिती वाहनचालकाला मोबाईलवरील मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे आणि त्यानंतर दंडाची रक्कम डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे अदा करावी लागणार आहे. ज्यांना ऑनलाईन व्यवहाराची माहिती नाही त्यांच्याकडून रोख रक्कम वसूल करण्यात येणार आहे. 


नियम मोडणा-यांवर अशी होणार कारवाई


मुंबईत जवळपास तीस लाख वाहन आहेत. त्यापैकी 15 लाख वाहनांची माहिती मुबंई वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध आहे. मुंबईतल्या जवळपास पाच हजार सीसीटीव्हींच्या माध्यमातून नियम मोडणा-यांवर करडी नजर ठेवली जाईल. 25 ऑपरेटरची यावर चोवीसतास नजर असेल. नियम मोडणा-या वाहनचालकांना एसएमएस पाठवून माहिती दिली जाईल. त्यासोबतच व्हिडिओ क्लिप आणि पावती पाठवली जाणार. दंडाची रक्कम भरण्यासाठी ऑनलाईन गेट वे तसच रोख रक्कम भरण्याचीही सोय असणार आहे.


चुकीच्या ठिकाणी वाहन पार्क करणा-यांवरही आता अधिक कडक कारवाई केली जाणार आहे. मुंबई वाहतूक पोलीस आता नविन हायड्रोलीक क्रेन विकत घेणार असून या क्रेनच्या सह्हाय्यान नो पार्किंगमधील वाहन टो केली जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या अखेर  पर्यंत अशा 80 क्रेन्स मुंबई वाहतूक पोलिसांकडे दाखल होतील... त्याच बरोबर एक नव अॅप मुंबई वाहतूक पोलीसांनी लाँच केलय, ज्या अॅपच्या माध्यमातून नागरिक वाहतूकीची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतील तसच फोटोही अपलोड करू शकतील.


वाहतुकीच्या नियमांच उल्लंघन करणा-या वाहनचालकांचे फोटो सामान्य नागरिकही अॅपवर अपलोड करू शकणार आहेत. अश्याप्रकारे 4 ते 5 वेळा नियमांच उल्लंघन करणा-या वाहनचालकांचा गाडीचालवण्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. थोडक्यात आता वाहतूक पोलीसांनी नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. याची अंमलबजावणी कशी होते हे पहाण महत्त्वाच ठरणार आहे.