मुंबई : मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वे मार्गावरील दुरूस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉकमुळे काही उपनगरीय लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


गोरेगाव ते सांताक्रुज अप आणि डाऊन फास्टवरील वाहतूक धिम्यागतीनं राहील. तर मध्य रेल्वेवर नाहूर, कांजूरमार्ग, विद्याविहार रेल्वे स्थानकावर धीम्या गाड्या थांबणार नाहीत. 


तसंच हार्बरवरील कुर्ला ते वाशी दरम्यानची अप आणि डाउनवरील वाहतूक बंद राहील.