मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच, २० मिनिटे लोकल लेट
मध्य रेल्वेवर सलग तिसऱ्या दिवशी लोकल २० ते २५ मिनिटे लेट आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गर्दीत घामाच्या धारेत अनेकांचा प्रवास होत आहे. गाड्या वेळेवर येत नसल्याने कार्यालयात पोहोचण्यास अनेकांना ऊशीर होत आहे.
मुंबई : मध्य रेल्वेवर सलग तिसऱ्या दिवशी लोकल २० ते २५ मिनिटे लेट आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गर्दीत घामाच्या धारेत अनेकांचा प्रवास होत आहे. गाड्या वेळेवर येत नसल्याने कार्यालयात पोहोचण्यास अनेकांना ऊशीर होत आहे.
कर्जतकडून येणाऱ्या लोकल २० ते २५ मिनीट उशीराने धावत आहेत. नेरळ-वांगणी दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची उदघोषणा करण्यात येत आहे. मात्र, सलग तिसऱ्या दिवशी रेल्वे लेट असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बुधवार रात्री सायनजवळ झालेला बिघाड, त्यानंतर गुरूवारीही वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर मध्य रेल्वेवर शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी बिघाडाचे सत्र सुरूच आहे. मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेय.