मुंबई पालिकेचा कारभार पारदर्शक, देशात पहिला क्रमांक
![मुंबई पालिकेचा कारभार पारदर्शक, देशात पहिला क्रमांक मुंबई पालिकेचा कारभार पारदर्शक, देशात पहिला क्रमांक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/02/01/215185-mumbai.jpg?itok=w5LWDksJ)
अर्थ मंत्रालयाने काल प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहाणी अहवालात मुंबई महापालिका पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेनं स्थायी समितीत अर्थमंत्री अरूण जेटलींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
मुंबई : अर्थ मंत्रालयाने काल प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहाणी अहवालात मुंबई महापालिका पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेनं स्थायी समितीत अर्थमंत्री अरूण जेटलींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून मुंबई मनपा सत्ताधारी शिवसेनेवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. मात्र अर्थ मंत्रालयाने मुंबई मनपाचा कारभार पारदर्शक असल्याचं प्रशस्तीपत्र दिल्याने भाजपच्या मुद्द्यातलीच हवा निघून गेली आहे.
पारदर्शक कारभारात अव्वल असल्याची होर्डींग्ज शहरात लावण्याची शिवसेनेने प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्यामुळे ज्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टार्गेट केले होते. तोच मुद्दा आता मुख्यमंत्री आणि भाजपला मुंबई पालिका निवडणुकीत अडचणीचा ठरणार आहे. शिवसेनेला भाजपविरोधात आता अधिक रान उठविण्याची आयती संधी मिळाली आहे.