आयुक्त तुकाराम मुंढेंच्या वर्तवणूकीची चौकशी होणार
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या वर्तवणूकीची वरिष्ठ अधिका-यामार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी केली आहे. तसंच या चौकशीचा अहवाल याच अधिवेशनात सभागृहात ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या वर्तवणूकीची वरिष्ठ अधिका-यामार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी केली आहे. तसंच या चौकशीचा अहवाल याच अधिवेशनात सभागृहात ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
प्रशासकीय अधिका-यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान केलाच पाहिजे असं बापटांनी नमूद केलं. तुकाराम मुंढेंच्या वर्तणूकीबाबतचा मुद्दा भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला होता.