नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आलीये. एस. रामास्वामी नवी मुंबई मनपाचे नवे आयुक्त असणार आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आलीये. एस. रामास्वामी नवी मुंबई मनपाचे नवे आयुक्त असणार आहेत.
मुंढे यांच्या बदलीच्या फाईलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सही झाली आहे, पण सामान्य प्रशासन विभागाने ऑर्डर काढलेली नाही. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून उद्या ऑर्डर काढली जाईल.
आपल्या बेधडक निर्णयामुळे आयुक्त तुकाराम मुंढे सुरुवातीपासूनच वादात सापडले होते. त्यातच राज्यभरातील बेकायदा बांधकामांना नियमित करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावित धोरणाला तुकाराम मुंढे यांचा विरोध होता. त्यामुळे शिवसेना नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आग्रही होते.
काही महिन्यांपूर्वी त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव पारित करून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावानंतरही मुंढे यांना आयुक्त पदावर कायम ठेवले होते. अखेर आज त्यांची बदली करण्यात आलीये.