नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सर्व पक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनपा सचिव चित्रा बाविस्कर यांच्याकडे दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर सर्वपक्षीय स्थायी समिती सदस्यांच्या सह्या आहेत.


हा ठराव मंगळवारी असलेल्या महासभेत मांडण्यात येणार असून तुकाराम मुंढे यांच्या विरोधातला प्रस्ताव पास होण्याची शक्यता आहे. 


सध्या १४ सदस्यांनी प्रस्तावावर सह्या केल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, विरोधक शिवसेना पक्षांच्या नगरसेवकांच्या सह्या आहेत. 


यामध्ये भाजपाच्या नगरसेविकांची सही नसल्याने सध्या तरी त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.