मुंबई : नाफेडने तूर खरेदी बंद केल्याने, सरकारने तूर तारण योजना सुरू केली आहे. या योजनेत तुरीच्या सध्याच्या किमतीच्या ७० टक्के रक्कम दिली जाणार आहे, या रकमेला ६ टक्के व्याजदर असेल. ही योजना शेतकऱ्याच्या मालासाठी आधीपासून असते, यात नवीन असे काही नाही. मात्र शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजदराचा भूर्दंड बसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना:


शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिकपातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार पेठेत विक्रीसाठी येतो. साहजीकच शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. सदर शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टीकोनातून कृषि पणन मंडळ सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. 


या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा व हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला असुन या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते. सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असुन सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते. या योजने अंतर्गत पणन मंडळाने सन 1990-91 ते 2015-16 अखेर पर्यंत एकुण रू. 15076.62 लाख इतके तारण कर्जाचे वाटप केलेले आहे.