मुंबईत दोन अपघात, दोघे जखमी
मुंबई शहरात मंगळवारी रात्री दोन अपघातात दोन लोक जखमी झाले.
मुंबई : मुंबई शहरात मंगळवारी रात्री दोन अपघातात दोन लोक जखमी झाले.
मुंबईतल्या उच्चभ्रू नेपियन सी रोड वर बेस्ट आणि टॅक्सीची धडक झाली. रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. मलबारहिल वरून ब्रीच कँडीच्या दिशेनं निघालेल्या टॅक्सीनं अर्जंट ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणाऱ्या बेस्ट बसनं टॅक्सीला धडक दिली. अपघातात टॅक्सीचा चक्काचुर झाला.
याप्रकरणी बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रात्री झालेल्या रिमझिम पावसामुळे वेळेवर ब्रेक लागला नाही....त्यामुळे अपघात झाल्याचं पुढे येतंय.
दुसरा अपघात विलेपार्लतल्या डोमेस्टिक विमानतळासमोरच्या उड्डाण पुलावर झाला. एका भरधाव टेम्पोनं टाटा सुमोला धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक जखमी झालाय. त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.