मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दोन अपघात झाले. आडोशी बोगद्याजवळ खोपोली एक्झिटजवळ कंटेनर आडवा झाल्याने वाहतूक ठप्प होती. 


तर दुसरा अपघात खालापूर हद्दीत माडप गावाजवळ झाला. त्यात बंद पडलेल्या रिट्स कारला बाजूला करायला गेलेल्या आयआरबीच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला कंटेनर ने डॅश दिली. त्यात एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.