मुंबई :  उत्तर भारतात थंडीनं पारा घसरत असला, तरी मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नाडा चक्रीवादळचा परिणाम आता संपुष्टात आला असला, तरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरी येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


शिवाय मुंबईतही पुढचे 48 तास ढगाळ वातावरण असणार आहे.  तर तिकडे उत्तर महाराष्ट्रात मात्र उत्तर भारतातल्या थंडीचा परिणाम दिसतोय. काल नाशिकचा पारा नऊ अंशांपर्यंत खाली आलाय. तर पुण्यातही पारा 10.9 अंशांपर्यंत खाली आहे.जळगाव, धुळे, नंदुरबार,आणि नगर भागातही थंडीमध्ये वाढ होणार आहे.