मुंबई :  राज ठाकरे यांच्या आग लावण्याच्या विधानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही आग विझविणारे आहोत, असं ते म्हणालेत... राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी मनसे अध्यक्षांवर टीका केलीये. 


विक्रोळीमध्ये फायर ब्रिगेडच्या कमांड सेंटरचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं... त्यावेळी उद्धव यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.


काय म्हटले होते राज ठाकरे 


राहुल बजाज यांच्या तयार असलेल्या ७० हजार रिक्षा विकण्यासाठी घाई गडबडीत ७० हजार परवाने दिले जात आहे, त्यातील ७० टक्के परवाने हे परप्रांतीयांना दिले जात आहेत, त्यामुळे अशा रिक्षा रस्त्यावर आल्या तर प्रवाशांना खाली उतरवा आणि जाळा, असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना दिले होते. 


 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रिक्षा जाळण्याचा आदेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंधेरीमध्ये एका रिक्षाला अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिलंय. 


पहिली रिक्षा जाळली


राज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने "रिक्षा" जाळलीराज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने "रिक्षा" जाळली. 
 
चार बंगला परिसरात अंधेरी आरटीओ कार्यालयाबाहेर गुरुवारी रात्री उशीरा एका रिक्षाला पेटवून देण्यात आलंय. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस दाखल झाले आहेत. रिक्षा क्रमांक एम एच ०२ व्ही ए ३२५८ या क्रमांकाची रिक्षा जाळण्यात आलीय. 


या घटनेची जबाबदारी अद्याप कुणी घेतली नसली तरी काल राज ठाकरेंच्या भाषणानंतर उमटलेली ही प्रतिक्रिया आहे, असं म्हटलं जातंय. या घटनेचा तपास सुरू झालाय