मुंबई : बहुमतात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानला धडा शिकवावा, असे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मराठा आरक्षण आणि अॅट्रोसिटीवर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी उद्धव यांनी यावेळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या उरी हल्ल्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकार पूर्ण बहुमतात आहे. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला. 


जनतेने मोठ्या आशेने मोदींना एकहाती बहुमत दिले आहे. त्यामुळे त्यांनी पाकवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तर मराठा आरक्षण आणि अॅट्रोसिटीवर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.